Skip to content Skip to footer

गर्दी जमवल्या प्रकरणी, भाजपा आमदारावर गुन्हा नोंद.

भाजप आमदार दादाराव केचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यालयात धान्य वाटपाच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याने प्रशासनाने जमाव बंदी कायद्या अंतर्गत केचे यांच्यावर कारवाही केली आहे.
भाजप आमदार दादाराव केचे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप कार्यक्रमात गर्दी झाल्याने आमदारांवर सर्वच बाजूने टीका झाली होती. आमदारांनी संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली केल्याची बातमी खाजगी वृत्तवाहिनीने दाखवताच जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले.
सध्या देशात कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचा लॉकडाउन जाहीर केला होता. परंतु आज त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने वरिष्ठांचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या जल्लोषात आणि गर्दीत कार्यक्रम घेऊन आपल्याच नेत्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

Leave a comment

0.0/5