Skip to content Skip to footer

कोरोना अपडेट : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार -अनिल परब

आज कोरोनाशी दोन हात करण्यासाठी केंद्र तथा राज्य शासन अथक प्रयत्न करत आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच बरोबर एसटीचे कर्मचारी सुद्धा अहोरात्र या संकटाशी सामना करण्यासाठी दिवस रात्र सेवा करत आहे. त्यांच्या या सेवेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कौतुक केले आहे. तसेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परब यांनी केली आहे.

यावर बोलताना परब म्हणाले की, संपूर्ण देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व व्यवहार बंद झाले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली होती. त्यानुसार दि.23 तरखे पासून मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या बसेसद्वारे दररोज अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a comment

0.0/5