Skip to content Skip to footer

लॉकडाऊनची संधी साधत मराठी तरुण व्यवसायात उतरत आहे.

लॉकडाऊनची संधी साधत मराठी तरुण व्यवसायात उतरत आहे. 

महाराष्ट्रातून दररोज लाखोंच्या संख्येने मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले आहे. मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत हे मजूर आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांच्या मागणीस्तव त्यांच्यासाठी विशेष गाड्यादेखील रोज सोडत आहेत. रोज मजुरांचे जत्थे च्या जत्थे त्यांच्या मूळ गावी जात आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात असल्याचे समजत आहे.

मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मुंबईतील तरुणांनी हीच ती वेळ म्हणत मिळेल त्या व्यवसायाकडे वळण्याचा मार्ग शोधल्याचे दिसून येत आहे. मुंबईत अनेक तरुणांना उत्तर प्रदेशी, बिहारी तरुणांची संगत मिळाली आहे. त्यांच्या मुंबई सोडून जाण्यानंतर आता मुंबईतील तरुणांनी ही संधी हेरून कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याचे धाडस दाखवले आहे.

अंधेरीत राहणारा हेमंत गुप्ते नावाचा तरुण शिवसेनेचे काम करायचा. त्याने आता स्वतःचा मासे विकण्याचा धंदा टाकला आहे. हा मराठी मुलाने अंधेरी पूर्व चकाला येथे रविवारी त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नव्याने व्यवसाय सुरु करण्याची ही हिम्मत आणि जिद्द हेमंत गुप्तेने दाखवली आहे त्यामुळे अनेक युवकांना प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनाची सुरुवात हेमंत गुप्तेच्या नावाने झाल्याचे मत शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a comment

0.0/5