Skip to content Skip to footer

‘सीबीआय चौकशी करायची असेल तर गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांच्या मृत्यूची करा !’ – खा. अरविंद सावंत

‘सीबीआय चौकशी करायची असेल तर गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांच्या मृत्यूची करा !’ – खा. अरविंद सावंत

अभिनेता सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करा अशी मागणी राज्यात विरोधकांनी केली होती. त्यामुळे आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात सुशांतसिंह राजपुत प्रकरणी चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले होते. यातच शिवसेना आणि भाजपा पक्षात सुद्धा संघर्ष पेटला होता.

भाजपाने सुद्धा विनाकारण आघाडी सरकारमधील नेत्याचे नाव या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. तसेच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. मात्र आता भाजपाच्या या मागणीला खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राजपूत प्रकरण सीबीआयकडे देता तसेच गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोहा यांच्या मृत्यूची देखील चौकशी सीबीआयने करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

तसेच बिहार पोलिसांचा या प्रकरणाशी काय संबंध ?, असे त्यांनी यावेळी विचारले आहे. तसेच मुंबई पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपस करत आहे. बिहार पोलिसांनी सांगितले म्हणून तपास सीबीआयकडे सोपवावा हे गरजेचे नाही. या प्रकरणात मुंबई पोलिसांचे खच्चीकरण होत आहे, असे सुद्धा खासदार सावंत यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5