Skip to content Skip to footer

पुण्यातील कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी ‘एकनाथ खडसें’ना पुन्हा दिलासा

 

महाराष्ट्र बुलेटिन : पुण्यातील कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना ८ मार्चपर्यंत दिलासा मिळाला आहे. खडसे यांच्या याचिकेवरील सुनावणी आज न झाल्याने ८ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

एकनाथ खडसे यांची पुण्यातील कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी चालू आहे. ईडीकडून खडसेंना समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र खडसेंनी या कारवाईला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. खडसेंच्या या याचिकेवर आज सुनावणी होणार होती, मात्र आज काही कारणांमुळे सुनावणी न झाल्याने ८ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे खडसेंना पुढील सुनावणीपर्यंत दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणी खडसे वादाच्या भोवऱ्यात अडकले तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर खडसे यांनी पक्ष नेतृत्वाकडून योग्य ती वागणूक न मिळाल्याचे सांगत गेल्या वर्षी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Leave a comment

0.0/5