Skip to content Skip to footer

राज ठाकरे यांचे मंदिर उघडणीच्या मागणीला राऊतांचे स्पष्टीकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे उघडण्यासाठी पत्र लिहिले आहे तसेच मॉल उघडले जातात मंदिरे का नाहीत असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. यावर आता खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.

राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यांना सगळं बंद करण्याची हौस नाहीये, असा पलटवार करतानाच थोडा संयम ठेवा, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल अशी बीटी राऊतांनी व्यक्त करून दक्खावली आहे. तसेच केंद्र सरकारप्रमाणे करोना ही देवाची करणी आहे, असं मानायला राज्य सरकार तयार नसल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला.

राज्यातील जनतेचे आरोग्य आणि जीवित लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. सगळं काही बंद राहावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही. उलट मंदिर सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची मनापासून इच्छा आहे. मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत, असे संजय राऊतांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5