Skip to content Skip to footer

शरद पवारांनी उडवली कंगनाची खिल्ली

 

शरद पवारांनी उडवली कंगनाची खिल्ली

सिनेअभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना पक्षातील वाद काही शमण्याचे नाव घेत नाही. त्यात्च मनपाने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगना रनौतने सदर जागा आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळच्या व्यक्तीकडून घेतलेली आहे, असा आरोप लावला होता. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी कंगनाची अक्षरशः खिल्ली उडवली आहे.

कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्किल टीपण्णी केली. ‘माझी पण इच्छा आहे… माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का..? हा प्रश्न आहे’, असे पवारांनी बोलून दाखविले.

वास्तव म्हणजे बीएमसीने कंगनाच्या खार येथे असलेल्या फ्लॅटच्या ठिकाणी नोटीस पाठवली होती. ज्या बंगल्यावर बीएमसीने बुधवारी कारवाई केली त्या पाली हिल येथील मालमत्तेला कोणत्याही प्रकारे बीएमसीने नोटीस दिली नव्हती. यावरही जी नोटीस बीएमसीने पाठवली ती फक्त माझ्यासाठी नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिसीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे, असे तिने बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5