Skip to content Skip to footer

मुंबईकरांना लवकरच आरे’मध्ये पर्यावरण पूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार – आदित्य ठाकरे

मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या आरे जंगलातील ६०० एकर जागा जंगल म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले होते. या निर्णयानंतर सर्व स्थरातून तसेच पर्यावरण प्रेमींनी, आरे वृक्षतोड विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले होते.

या निर्णयानंतर काल पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे जंगलाला भेट दिली. या जागेच्या युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली. मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येईल असे सुद्धा मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.

आदित्य ठाकरे यांच्या आरे दौ-यात यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, दुग्धविकास आयुक्त भांगे उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5