Skip to content Skip to footer

महापौर किशोरीताई पेडणेकर यांची कोरोनावर मात

महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनावर मात केली असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. १० सप्टेंबरला किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती त्यांच्यावर सेव्हनहिल हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपाय सुरु होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केले होते. स्वतः त्यांनी सायन येथील लोकांनी टिळक रुग्णालयात पीपीइ किट घालून कोरोना वार्डात रुग्नांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता.

Leave a comment

0.0/5