Skip to content Skip to footer

खड्यांमुळे शिवसेना झाली आक्रमक, आयुक्तांना फिरवले खड्यांतील रस्त्यातून

नगर शहरात रस्त्यावर असलेल्या खाड्यांमुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहावयास मिळालेली आहे. खड्ड्यांमुळे नगर शहरातील रस्ते अतिशय खराब झाले असून ते दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी चक्क महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनाच नगर शहरात पायी फिरवले आहे.

यावेळी महानगर पालिका आयुक्त मायकलवार यांच्यासह अधिकारी वर्गाबरोबर शिवसैनिकांनी शहरातील विविध ठिकाणाचे खड्डे आयुक्तांना दाखवले. तसेच काही खड्ड्यात हार, फुले वाहून शिवसैनिकानी गांधीगिरी करत खड्ड्यांची पूजा सुद्धा केली. तसेच यावेळी शिवसैनिकांनी महापालिका प्रशासन तसेच महापौर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मागील दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात सतत पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत असून अपघात सुद्धा होऊ लागले आहे. अखेर शिवसेनेने काल आक्रमक होत चक्क मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनाच खड्डेमय रस्त्यांवरून पायी फिरवले. तसेच खड्डे बुजवले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Leave a comment

0.0/5