Skip to content Skip to footer

राज्यात केंद्राच्या मदतीची मोठी आवश्यकता, खासदार बारणे यांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढत आहे. राज्यात दिवसाला नवीन २३ हजार रुग्नांची नोंद होत आहे. त्यात फक्त पिपंरी चिंचवड शहरात दिवसाला ५००० रुग्नाची भर पडत आहे. त्यामुळे राज्याला केंद्राची मोठ्या मदतीची आवश्यकता आहे. मात्र असे असताना केंद्र सरकारने १ सप्टेंबर पासून व्हेंटिलेटर, पीपीइ किट, एन ९५ मास्क याचा पुरवठा राज्य सरकारला करणे बंद केले आहे.

सदर केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट उभे थाटलेले असताना सरकारने वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा तात्काळ पुरवठा पूर्वरत सुरु ठेवावा अशी मागणी खासदार बारणे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात बारणे यांनी आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांची भेट घेऊन निवेदन दिले तसेच राज्यात दिवसाला २३ हजार कोरोना रुग्नाची वाढ होत आहे मात्र दिलासादायक बातमी म्हणजे ७२ टक्के रुग्ण कोरोनमुक्त होत आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली.

तर केंद्र सरकारकडून जीएसटी परताव्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. वैद्यकीय उपकरणांसाठी मोठा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वैद्यकीय उपकारांचा पुरवठा पूर्वरत सुरु ठेवावा अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5