Skip to content Skip to footer

NDA म्हणजे No Data Available काँग्रेस खासदाराची टीका

NDA म्हणजे No Data Available काँग्रेस खासदाराची टीका

केंद्र सरकारने स्थलांतरित मजूर ते शेतकरी आत्महत्येपर्यंत अनेक विषयां संबंधित माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी यावरून मोदी सरकारला टोला हाणला आहे. ‘एनडीए’ म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’ असा टोला शशी थरुर यांनी लगावला आहे.

यावर ट्विट करताना शशी थरुर म्हणतात की, “स्थलांतरित मजुरांवर डेटा नाही, शेतकरी आत्महत्येवर डेटा नाही, कोविड मृत्यूंवर संशयास्पद डेटा, जीडीपीवरही गोंधळात टाकणार डेटा…या सरकारने एनडीएला एक वेगळाच अर्थ दिला आहे,” असं ट्विट शशी थरुरु यांनी केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी एक कार्टून शेअर केलं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन ‘एनडीए’ म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’ असं सांगताना दाखवण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5