Skip to content Skip to footer

उदयोग आणि पर्यावरणाचा समतोल राखून माहूल गावाचा विकास करावा – आदित्य ठाकरे

मुंबई येथील माहुल गावातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या नियमांचे पालन करून तेथील उद्योग आणि पर्यावरणाचा समतोल राखून परिसरातील प्रदूषण नियंत्रित राखावे असे आदेश पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

माहुल येथील प्रदूषण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज्यमंत्री संजय राठोड, पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे,माहुल गावातील विविध उदयोग प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी उपस्थित होते.

माहुल गावामध्ये वाढत्या प्रभूषणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या उद्योगांनी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून माहुल गावांमध्ये उद्योगांनी पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निषकांची पूर्तता करणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले.

Leave a comment

0.0/5