Skip to content Skip to footer

एसटी पूर्ण क्षमतेने राज्यात धावणार, परिवहन मंत्री अनिल परब यांचे वक्त्यव्य

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील सह महिन्यापासून संसर्गाला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यभरात एसटीची सेवा बंद होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतके पैसे सुद्धा एसटीच्या तिजोरीत नव्हते. मात्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी यावर चर्चा करून यावर तोडगा काढत येत्या गुरुवारी एका महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी ताहिती आपल्या ट्विटच्या माध्यमातून कळवली आहे.

तसेच संपूर्ण राज्यभरात पूर्ण क्षमतेने एसटीची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी बसेसला परवानगी देताना सर्व गोष्टींचा विचार करुन पूर्ण क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय घेतला आहे असे बोलून दाखविले. हे करताना बसमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे. प्रत्येक फेरीला बसेसचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. प्रवाशांसाठी देखील बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रवाशाने हात सॅनिटाईझ केल्यावरच बसमध्ये प्रवेश करायचा आहे. सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेऊन आम्ही पूर्ण क्षमतेने बस सुरु करण्याचा निर्णय घेतला होता असे परब यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5