Skip to content Skip to footer

गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? यावर संजय राऊत यांचे उत्तर

गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? यावर संजय राऊत यांचे उत्तर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. एकूण २४३ मतदार संघ असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यातच येत्या बिहार निवडणुकीसाठी शिवसेना उतरणार असल्याचे संकेत यापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी दिले होते. त्यातच आता या निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

 

यावर बोलताना राऊत म्हणाले की, बिहार निवडणुकीला उतरण्याचा निर्णय आमचा झाला आहे. ३०ते ४० जागा लढण्याचा आमचा विचार आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दोन दिवस थांबा, सर्व चित्र स्पष्ट होईल असे सूचक उत्तर देखील त्यांनी दिले आहे.

 

दोनच दिवसांपूर्वी बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना बिहारचे प्रमुख हौसलेंद्र शर्मा हे देखील उपस्थित होते. बिहार निवडणुकांमध्ये ५० जागा पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर, योग्य वेळी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असे संजय राऊत यांनी सांगितले होते.

Leave a comment

0.0/5