रिपोर्टींग करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारांशी आर. भारत चॅनेलच्या सुरक्षा रक्षकांची अरेरावी भाषा
आर. रिपब्लिकन न्युज चॅनेलचे खोट्या टीआरपीमध्ये नाव आल्यामुळे रिपोर्टिंग करण्यासाठी गेलेल्या झी२४ तासाच्या महिला पत्रकारांशी आर. भारत वृत्त समूहाच्या कार्यालयाच्या गेट बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अरेरावी भाषा वापरात हटकले होते. या घटनेमुळे रिपब्लिकनचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी सारखेच सुरक्षा रक्षकांचे वर्तन आहे हे आता समोर आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. रिपब्लिकच्या ऑफिसबाहेर सुरक्षारक्षकांनी राडा करण्याचा प्रयत्न केला असे प्रत्यक्ष दर्शीकडून संगणयत येत आहे. तुम्ही येथे येऊ शकत नाही, असे म्हणत कॅमेरामनला अडविण्याचा प्रयत्न केला. ‘झी न्यूज’ने दोन्ही भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकच्या सुरक्षारक्षकांनी केले.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन क्षेत्रातील खोट्या टीआरपीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं केलेल्या तपासात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा हे दोन मनोरंजन चॅनल आणि रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीचं नाव समोर आले आहे. बार्क या संस्थेने हंसा एजन्सीला टीआरपीचे आकडे गोळा करण्याचं काम दिले आहे.