केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे दिल्ली येथे निधन झाले आहे. या दुखःद घटनेवर महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. शिवाय शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र आज उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले आहे. या संदर्भातील माहिती त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून दिले होते.
या घटनेवर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणतात की, “केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानजी यांच्या निधनाने दुःख झालं. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवानजी यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती. त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे.