Skip to content Skip to footer

मराठा आरक्षणासाठी पुकारलेला बंद मराठा संघटनेने घेतला मागे!

मराठा आरक्षणासाठी पुकारलेला बंद मराठा संघटनेने घेतला मागे!

 

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवरून संपूर्ण राज्यभरात मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.

 

काल मराठा समाजाच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून १ महिन्यांचा अवधी त्यांनी घेतला आहे. याशिवाय एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही  सकारात्मक चर्चा झाल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितले आहे.

 

महिन्याभरात आम्ही दोन्ही प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन सरकारकडून मिळाल्यामुळे आम्ही तात्पुरता बंद मागे घेत असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यास सरकार अनुकूल असल्याचा दावा केला आहे.

Leave a comment

0.0/5