Skip to content Skip to footer

मध्यप्रेदश पोट निवडणुकीत शिवसेना सर्व जागांवर उमेदवार उभे करणार?

मध्यप्रेदश पोट निवडणुकीत शिवसेना सर्व जागांवर उमेदवार उभे करणार?

मध्यप्रदेशमध्ये शिवसेनेची ताकद जास्त नसली तरी शिवसेना मध्यप्रदेशात निवडणूक लढवत आलेली आहे. यंदा सुद्धा शिवसेना पोट निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित राहिला होता. सध्या महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस बरोबर आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात शिवसेना काँग्रेस बरोबर पोट निवडणुकीला सोमारे जाणार की मध्यप्रदेशात एकटी निवडणूक लढणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मुद्द्यावर सुरु झालेली संघटना आज हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन प्रादेशिक पक्ष न राहता इतर राज्यात सुद्धा आपली ताकद वाढवताना दिसत आहे. त्यामुळेच आता शिवसेना राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. याआधी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं कमी जागा लढवून देखील चांगली मतं मिळवली होती.

यंदा बिहार विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० जागांवर शिवसेना आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. या निवडणुकीसाठी अनेकांचे प्रस्ताव आले आहेत. पण शिवसेना हिदुत्वाच्या मुद्द्यांवर कायम आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षांसोबत जाण्याची मानसिकता नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या वेळेसची बिहार विधानसभेची निवडणुका शिवसेना संजय राऊत यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि बिहारमध्ये शिवसेनेची तयारी सुध्दा झाली आहे.

Leave a comment

0.0/5