Skip to content Skip to footer

बिहार पाठोपाठ मध्यप्रदेशात शिवसेना देणार भाजपाला टक्कर

 

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष ४० ते ५० जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यात शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी वाजविणारा व्यक्ती’ हे निवडणूक चिन्ह सुद्धा मिळाले आहे. तर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून स्टार प्रचारकांनी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. त्यात आता मध्यप्रदेशात होणाऱ्या पोट निवडणुकीत सुद्धा शिवसेना भाजपाला टक्कर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळत आहे.

मध्य प्रदेशातील २८ जागेसाठी पोटनिवडणुक होणार आहे. ३ नोव्हेंबरला हे मतदान होत असून, महाराष्ट्रातून शिवसेनेचे काही नेते प्रचाराला जाण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या २७ आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक पार पडत आहे. तसेच एका आमदारायाचा मृत्यू झाल्यामुळे तेथे सुद्धा पोटनिवडणूक होणार आहे.

दरम्यात सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात शिवसेना पक्षाला बदनाम करणाऱ्या बिहार मधील सरकारला जोरदार टक्कर देण्याचे काम शिवसेना पक्ष करणार आहे, असे चित्र दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5