Skip to content Skip to footer

दिल्ली दरबारी चमकूगिरी आमदार लाड यांना पडली भारी, नेटकऱ्यांनी केली ट्रोल

 

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने अद्याप शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यात राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपा पक्षाने सर्व राज्यभरात आंदोलन सुरु केले होते. तर मुंबईत भाजपाच्या वतीने सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि भाजपा कार्यकर्त्यासमवेत आंदोलन करण्यात आले होते.

काहीही झालं तर आम्ही मंदिरात प्रवेश करणार या मागणीनंतर पोलिसांनी दरेकर आणि प्रसाद लाड यांना ताब्यात घेतले. यावेळी आमदार प्रसाद लाड यांच्या मुखवट्यावरून मास्क खाली असल्याचे झी २४ तास समूहाच्या पत्रकाराने लक्षात आणून दिले होते. त्यामुळे लाड यांनी मनपा कार्यालयात जाऊन मास्क नीट न लावण्याचा २०० रु दंड कार्यालयात भरला होता. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती. मात्र माहिती देताना वापरलेल्या हिंदी भाषेवरून आमदार लाड यांना नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले होते.

“गलती को माफी नाही, हम कोहीभी हो न्याय व्यवस्था सबसे बडी होती है.. आंदोलन मे पोलीस की दडपशाही के कारण मेरा मुह का मास्क निच्ये आय मुझे ये बात @Zee24tassnews ने नजर मे लाई मैने मेरी गळती की माफी मांगते हुवे खुद महानगर पालिका कार्यालय जाके खुद्द जुर्माना भर दिया….. !”, असे त्यांनी हिंदीत ट्विट केले होते. मास्क न लावल्याबद्दल त्यांनी २०० रुपयाचा दंड सुद्धा भरला होता. त्याचा फोटो देखील त्यांनी आपल्या ट्विटरवर अपलोड केला होता.

Leave a comment

0.0/5