Skip to content Skip to footer

एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीत स्वागतच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीत स्वागतच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली. नाथाभाऊ समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे.

मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

Leave a comment

0.0/5