‘आपण देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडलाय’, खडसेंचा घणाघाती आरोप
भाजपचे जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना, आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीका केली होती.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, फडणवीस यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहे असे खडसे यांनी पक्ष सोडण्याच्या कारणासंदर्भात बोलताना म्हणाले होते. त्याचप्रमाणे खडसे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपल्याविरोधात कधी चौकशीची मागणी केली नाही, असेही म्हटले आहे.
२०१४ साली फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर खडसे यांना मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याचसंदर्भात बोलताना खडसे यांनी, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यावेळी विरोधात असणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्या चौकशीची मागणीही केली नव्हती असे म्हटले आहे.
विरोधी पक्षांनी साधी चौकशीहीची मागणी केली नसताना मला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आला. त्यावेळी या पक्षांनी माझ्या चौकशीची मागणी केली असती तर मी राजकीय संन्यास घेतला असता, असंही पुढे बोलताना खडसेंनी स्पष्ट केले होते.