Skip to content Skip to footer

मुंबई मनपात पुन्हा आघाडी करून एकत्र निवडणूक लढणार ! – संजय राऊत


मुंबई मनपात पुन्हा आघाडी करून एकत्र निवडणूक लढणार ! – संजय राऊत

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर महाविकास आघाडी स्थापन करून एकत्र मनपा निवडणूक लढणार आहेत, असा दावा एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे यंदा होणारी मनपा निवडणूक तीन विरुद्ध एक अशीच रंगताना दिसून येणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनवताना शिवसेनेने आपल्या जुन्या मित्र पक्षाला अर्थात भाजपाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती करून आघाडीचे सरकार स्थापन केले होते. तसेच शिवसेना पक्षासाठी मुंबई मनपा निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची राहिलेली आहे. त्यामुळे येणारी मनपा निवडणूक शिवसेना एकटी लढणार की इतर पक्षाला बरोबर घेऊन लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

त्यात मनपात २५ वर्ष शत्रुपक्ष असलेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती करून राज्यात शिवसेना आघाडी सरकार स्थापन करून त्यांच्या मांडीला-मांडी लावून सत्तेत बसलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाबरोबर मिळून मनपात सत्ता स्थापन करणार की, स्वतंत्र लढणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत येणारी निवडणूक शिवसेना आघाडी स्थापन करून लढणार याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

Leave a comment

0.0/5