Skip to content Skip to footer

एसटीची हंगामी दिवाळी दरवाढ रद्द, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांची माहिती.

एसटीची हंगामी दिवाळी दरवाढ रद्द, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांची माहिती.

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दरवर्षी प्रमाणे दिवाळीच्या सुट्टीमध्ये केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांना सध्या नियमांनुसार सुरू असलेल्या तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

 

राज्य परिवहन मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून ३० टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी १० ते १५ टक्क्यांपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत असतो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे, असं परब म्हणाले.

Leave a comment

0.0/5