आनंदवार्ता : कोविशील्ड लस कधी येणार, सायरस पुनावाला यांची माहिती.
सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसी संदर्भात सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी माहिती दिली आहे. ‘कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशिल्ड’ या लशीच्या भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. या लसीचे १० कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होतील. डिसेंबरपर्यंत आमच्या चाचण्या पूर्ण होऊ शकतील. जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. पण, ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लसीची येथील उपलब्धता अवलंबून आहे, असे पूनावाला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सीरम इन्स्टिट्युटने लसीच्या उत्पादनासाठी करार केला असून, या लसीच्या सुरक्षिततेबाबत आता खात्री झाली आहे. या लशीने कोविड १९ विषाणू विरोधात चांगली प्रतिकारशक्ती तयार होते हेही स्पष्ट झाले आहे. भारतात आणि परदेशातही या लसीच्या चाचण्या झाल्या एक-दोन वर्षे लागतील. कारण लसीने प्रतिकारशक्ती दीर्घकाळासाठी वाढवली की नाही हे यात महत्त्वाचे असते. तरीही कोविशिल्ड लसीबाबत सर्व घटक सकारात्मकच आहेत. ही लस २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले.