Skip to content Skip to footer

मुंबईत उद्या ‘या’ ठिकाणी राहणार पाणी कपात!

मुंबईत उद्या ‘या’ ठिकाणी राहणार पाणी कपात!

उद्या (११ नोव्हेंबर) रोजी मुंबईतील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार असून, जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील सात ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हा निर्णय पालिकेने घेतलेला आहे असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे १८०० मिमी व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीमध्ये सुमननगर जंक्‍शनजवळ गळती झाल्याचे आढळून आले होते. ही गळती बंद करण्‍याचे काम ११ नोव्‍हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेमध्‍ये पूर्ण करण्याचा मानस मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे काही महापालिकेच्या सात विभागांमधील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहिल. तसेच १२ नोव्‍हेंबर २०२० रोजी काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

या विभागात पाणी पुरवठा राहणार बंद!
एम पूर्व , एम पश्चिम, एफ दक्षिण, एफ उत्तर, बी विभाग, ई विभाग आणि ए विभाग.

Leave a comment

0.0/5