Skip to content Skip to footer

कोरोनावर मात केल्यानंतर अजित पवार मंत्रालयात दाखल!

कोरोनावर मात केल्यानंतर अजित पवार मंत्रालयात दाखल!

काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली होती. तसेच त्यावर पुढील उपचार घेण्यसाठी त्यांना मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २ नोव्हेंबर रोजी अजित पवार कोरोनामुक्त झाले होते.

त्यानंतर आज ते कोरोनामुक्त झाल्यावर मंत्रालयात दाखल झाले. तसेच आज पासून कामकाज करताना ही ते दिसून आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केले. यात अजित पवार काही फाईलींवर सह्या करताना दिसून आले होते. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी आपल्या खुर्चीपासून बरेच अंतर ठेवलं असल्याचे लाईव्हमध्ये स्पष्ट दिसत होते. या लाईव्हमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, दत्तात्रय भरणे गप्पा मारताना दिसत आहेत.

मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून त्यांना २ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी आठवडाभर घरातच विश्रांती घेतली. त्यावेळीही सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून अजित पवार कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले होते. थकवा जाणवत असल्याने अजित पवार चार दिवस होम क्वॉरन्टाईन होते. परंतु कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना २६ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले.

Leave a comment

0.0/5