मुंबई पोलीस कंगना रनौत हिला अटक करण्याच्या तयारीत?

मुंबई पोलीस कंगना रनौत हिला अटक करण्याच्या तयारीत?

हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात वाद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्या मधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कंगनाची चौकशी केली जाणार आहे. कंगणाचे ट्विटर कोण चालवते? की कंगणा स्वतः ट्विट करते, याबाबत आता चौकशी केली जाणार आहे. कंगणा सोबतच बहिण रंगोली हिची देखील चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे, दरम्यान याबाबत चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी समन्स बजावले होते.

कंगनाला १० नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर रहायचं होते, तर रंगोलीला ११ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर रहायचं होते. मात्र, यातील एका समन्सला उत्तर देताना त्यांनी घरात लग्न असल्याचे कारण दिले होते. मात्र आता कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावला आहे. २३ नोव्हेंबरला कंगनाला, तर २४ नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता कंगनाला या प्रकणावरून अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून, आता मुंबई पोलीस कंगनाला अटक करण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्तवाहिनी ‘एबीपी माझा’ ने दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here