Skip to content Skip to footer

जे.जे. रुग्णालयात होणार कोरोना चाचणी ?

 

संपूर्ण देशभरावर कोरोनाच्या संसर्गाचे संकट ओढावले आहे. त्यात वाढती रुग्णसंख्या अधिक चिंतेत भर घालणारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या परिवाराची कायजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोना लस येईपर्यंत सर्वांनी हात धुणे, मास्क वापरणे आणि योग्य अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन मंत्री टोपे यांनी केले आहे. दरम्यान, आता जे.जे. रूग्णालयातही आता कोरोना लसीची चाचणी होणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

भारत बायोटेकने बनवलेल्या स्वदेशी ‘लस’ची चाचणी जे.जे. रूग्णालयात होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचणीला सुरुवात होणार आहे. तसेच १ हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. त्याआधी लोकमान्य (सायन) रूग्णालयातही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन ‘कोरोना लस’ची चाचणी होणार आहे. तर केईएम आणि नायर रूग्णालयात सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेल्या कोवीशिल्ड ‘लस’ची चाचणी सुरू आहे.

तर दुसरीकडे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील लसीची निर्मिती केली आहे. याची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे ही लस पुढील वर्षी म्हणजेच दोन ते तीन महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सिरमच्या कोरोना लसकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

0.0/5