Skip to content Skip to footer

१०५ आमदार घरी बसवले, पण पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील – संजय राऊत

विक्रोळी येथे एका कार्यक्रमाला शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत आले असता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचंय आणि तसेच आपला पंतप्रधान व्हायलाच हवा असे भाष्य करत राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला आवाहन दिले आहे.

यावर बोलताना राऊत म्हणाले की, “मगाशी पगड्या घालण्यात आल्या, पण पुणेरी पगडी वेगळी असते. पेशव्यांची पगडी वेगळी आहे. ही पगडी म्हणजे संकेत आहे. बाजीराव पेशव्यांनी दिल्लीपर्यंत आपले साम्राज्य नेलं होतं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचं. आपला पंतप्रधान व्हायला हवा.” असे बोलून दाखविले.

बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला घडवलेले आहे, हा साचा वेगळाच असून, तो कुठेही मिळणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील ही शिवसेना देशामध्ये अजिंक्य आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच १०५ आमदार घरी बसवले, आता त्यांचे १०५ ठीक आहेत, पण पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील’, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5