मुंबईकरांना पाणी जपून वारण्याचे आवाहन बृहमुंबई महानगर पालिकेने केले आहे. करण २२ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते २३ डिसेंबर रोजी साक्ली १० :०० वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागात १५ टक्के पाणी कपात असणार आहे.
घाटकोपर, कुर्ल्यात जवळपास २४ तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगाव दरम्यानच्या येवई इथल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या दुरुस्ती कामामुळे ही पाणी कपात करण्यात येत आहे. अशी माहिती बृहमुंबई मनपाने दिलेली आहे.
घाटकोपर उच्चस्तर जलाशयातील कप्पा-१ ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मि.मी. व्यासाची झडप बसविण्याचे काम २२ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार असून ते २३ डिसेंबर रोजी सकाळी १० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कुर्ला आणि घाटकोपरमधील काही भाग वगळता उर्वरित मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.