Skip to content Skip to footer

“शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडीत नेहरू जबाबदार”, मुकेश खन्ना यांचे वक्तव्य

सध्या देशात शेतकरी कृषी कायद्यावरून जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्ली येथे मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहे. त्यातच आता शक्तिमान फेमी अभिनेता मुकेश खन्ना यांनी शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला देशाचे माजी पंतप्रधान जवाहरला नेहरू यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीका केली आहे.

यूट्यूबच्या माद्यमातून त्यांनी यावर भाष्य केले आहे. “लोकांना वाटतं मी भाजपा पाठिंबा देतोय पण हे खोटं आहे. मी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांच्या त्याच समस्या आहेत. गेल्या ७० वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. अन् याला आपल्या देशाचं धोरण आहे.

पुढे बोलताना खन्ना म्हणतात की, ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी शहरीकरणाला प्राधान्य दिले. त्याऐवजी त्यांनी खेड्यांना सक्षम केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. देशातील ७५ टक्के भाग खेडी आणि गावांनी व्यापला आहे. आपण त्यांच्या विकास करायला हवा.” अशा आशयाची वक्तव्य त्यांनी या व्हिडीओमध्ये केली आहे.

Leave a comment

0.0/5