Skip to content Skip to footer

भविष्यात जो भूकंप होईल त्याच केंद्रस्थान शिवसेना भवन असेल – संजय राऊत

कोरोनाच्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी म्हणून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमुळे विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करणे सुरु केले आहे. आता विरोधकांच्या या टीकेचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

भाजपचे काही लोक टीका करता आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात. टीका करणाऱ्या भाजपच्या लोकांना भारतरत्न द्यायला हवा असा टोला राऊत यांनी लगावला आहे. ” टीका करणाऱ्या लोकांना लोक मारायची आहेत, तर मुख्यमंत्र्यांना लोक वाचवायची आहेत. संचारबंदी लादण्यात मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही असे राऊत म्हणाले.

आगामी काळात देशात राजकीय भूकंप होणार असे सुद्धा संजय राऊत यांनी बोलून दाखविले. महाराष्ट्राचे नेतुत्व तीन पक्षांनी मिळून करायचे ठरविले आहे, आमचा एकही आमदार फुटणार नाही असे विरोधक बोलत होते. थोडं थांबा काय काय होतंय ते दिसेल.भविष्यात जो भूकंप होईल त्याच केंद्रस्थान शिवसेना भवन असेल असे संजय राऊत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5