Skip to content Skip to footer

शिवसेनेत आहे, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेत मारणार – संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटिस धाडण्यात आली आहे. खात्रीदायक सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार २९ तारखेला वर्षा संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला होता.

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटिस आल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असते, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला ठणकावून सांगितले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. सध्या ईडीसारख्या सरकारी संस्थांना काही काम राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधकांचा मानसिक छळ करणे हे त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, असेही राऊत म्हणाले.

Leave a comment

0.0/5