Skip to content Skip to footer

ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असत ते भाजपात जातात, संजय राऊतांचा टोला

आम्ही मध्यमवर्गीय माणसे आहोत. आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं ते घाबरून भाजपमध्ये जातात. आम्ही शिवसेनेत आहोत. राहणार आणि शिवसेनेतच मरणार अशा शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेत्यांना सुनावले आहे.

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मी संसदेचा सदस्य आहे. कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. आम्ही स्वत: कायदे करण्याच्या प्रक्रियेत असतो. त्यामुळे सरकारच्या तपास यंत्रणेकडून माझ्या कुटुंबाला एखादा कागद आला असेल तर त्याचा आदर करणं हे माझे कर्तव्य आहे. भलेही त्यात राजकारण असेल असे राऊत म्हणाले.

Leave a comment

0.0/5