Skip to content Skip to footer

TRP घोटाळ्यात गोस्वामी यांना होणार अटक? मुंबई पोलिसांनी प्रथमच घेतले नाव

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ( BARC ) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. TRP मध्ये फेरफार करण्यासाठी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी वेळोवेळी लाखो रुपये देत होते. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार फिरू लागली आहे.

पार्थो दासगुप्ता यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी किला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोठडी वाढवून मिळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जात टीआरपी घोटाळ्याला नवी कलाटणी देणारी माहिती पुढे आली आहे. पार्थो दासगुप्ता यांनी रिपब्लिक भारत आणि रिपब्लिक टीव्हीच्या इंग्रजी चॅनेलच्या टीआरपीत फेरफार करण्यासाठी अर्णब गोस्वामी व अन्य संबंधितांशी संगनमत करून बेकायदा काम केले, असे पोलिसांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

टीआरपीत फेरफार करण्याच्या बदल्यात अर्णब गोस्वामी यांनी पार्थो यांना वेळोवेळी लाखो रुपये दिले आहेत. या पैशांतून पार्थो यांनी मौल्यवान वस्तू, महागडे दागिने खरेदी केले आहेत. पार्थो यांच्या घराची झडती घेतली असता घरातून एक लाख रुपये किमतीचं हातातलं घड्याळ, चांदीसारख्या धातूपासून बनवलेले ३०० ग्रॅम वजनाचे दागिने सापडले आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयापुढे ठेवली.

Leave a comment

0.0/5