Skip to content Skip to footer

शिवसेनेचं बोट धरुन विधानसभेत आल्याचा सतेज पाटील यांना विसर – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीच्या पूर्वी आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. त्यात काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगर पालिकांमध्ये “एकला चलो रे” चा नारा दिल्यावर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांना विधासभेची आठवण करून दिली आहे.

यावर बोलताना क्षीरसागर म्हणाले की, स्वबळाची भाषा सर्वात आधी राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना मेळाव्यात केला होता. असा दावादावा कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. क्षीरसागर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. सतेज पाटील शिवसेना आणि राष्ट्रवादीला टेकओव्हर करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी यावर पाटील यांच्यावर केला होता.

पालकमंत्री बंटी पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेसंदर्भात कसबा-बावडा इथे फिक्सिंग भाषणाचा मेळावा घेतला. या भाषणात कोल्हापूर महापालिकेत शिवसेना वेगळी लढेल, असं मी (राजेश क्षीरसागर) पहिल्यांदाच म्हटल्याचा आरोप केला. माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, की आपल्याकडे मोठी यंत्रणा आहे, गेल्या काही महिन्यातील वर्तमानपत्रं काढून पाहावीत. वेगळं लढूया असं पहिल्यांदा कोण म्हणालं, हे तुम्हाला दिसून येईल.

Leave a comment

0.0/5