Skip to content Skip to footer

प्रदूषण मुक्तीसाठी स्वतंत्र पंचगंगा प्राधिकरण स्थापन करा – धैर्यशील माने

कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यात बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक निधीसह पंचगंगा नदीसाठी स्वतंत्र अधिकार असलेले प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. सदर बैठक मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर झाली.

दरम्यान,कोल्हापूर जिल्ह्यासाठी जिवनदायीनी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदुषित पाण्यामुळे दुषित झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी सह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना नदी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्यासाठी भरीव निधी सह स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.

प्रदूषणाचा विळखा मोठ्या प्रमाणात असल्याने जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याचा परिणाम नदीकिनारी असलेल्या गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे सदर प्रश्नाचे गांभीर्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने या प्रश्नाबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली

Leave a comment

0.0/5