Skip to content Skip to footer

कोरोना लसीकरणाचा पंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात फज्जा, चक्क सायकलवरून पोहचवली लस

कोरोना लसीकरणाच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर दहा दिवसांत देशात लसीकरण मोहीम सुरू करण्यास सज्ज असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील आठवड्यात लसीकरण मोहीम सुरु होणार असल्याचे संकेत केंद्राने दिले असून अंतिम निर्णय केंद्र सरकार लवकरच जाहीर करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने मागील काही दिवसांपासून देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लसीकरण सराव फेरी म्हणजेच ड्राय रन घेतली. ही ड्राय रन यशस्वी झाल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. लसीकरणादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि त्यामध्ये असणारे दोष दूर करता यावेत यासाठी ड्राय रन घेण्यात आल्या होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये करोना लसीकरणाच्या तयारीची फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाराणसीमधील ड्राय रनदरम्यान आरोग्य कर्मचारी चक्क सायकलवरुन करोनाची लस घेऊन रुग्णालयात दाखल झाला आणि अनेकजण गोंधळात पडले. रुग्णालयामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले मात्र लस रुग्णालयापर्यंत कशी पोहचवली जाईल यासंदर्भातील ड्राय रनमध्ये प्रशासनाची कोणतीही तयारी दिसून आली नाही. वाराणसीमधील चौकाघाट करोना लसीकरण केंद्र असणाऱ्या महिला रुग्णालयात चक्क सायकलवरुन लस पोहचवण्यात आली. विशेष म्हणजे ही लस रुग्णालयात पोहचली तेव्हा तेथेही कोणतीच तयारी करण्यात आली नसल्याचे दिसून आलं. ही लस सायकल वरून पोहचवण्यात आल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा बेजबाबदारपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Leave a comment

0.0/5