नितेश राणे हे पहिले हँग, चाराण्यासारख्या गोष्टी करतात – अब्दुल सत्तार

राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली होती. तर काही मंत्री, त्यांचे कुटुंबिय यांच्यासह युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. याच गोष्टीवरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

आता त्यांच्या या टीकेला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार उत्तर दिले आहे “चाराण्यासारख्या गोष्टी करणाऱ्यांनी अशाप्रकारे बोलावं याचं मला आश्चर्य वाटतंय. कोणाला सुरक्षा द्यावी कोणाला नाही द्यावी हे शासन ठरवेल. अभिनेत्री कंगणा रनौतला सुरक्षेची किती गरज होती? हे आपण केंद्र सरकारला विचारलं पाहिजे. कंगणाला अशी सुरक्षा दिली की तशी महाराष्ट्रात मंत्र्याला सुरक्षा नाही. कंगणाला मंत्र्यापेक्षाही जास्त सुरक्षा देण्यात आली. सुरक्षेची कुणाला आणि किती आवश्यकता आहे? याचा रिपोर्ट प्रशासन देते, त्यानुसार सुरक्षा दिली जाते” अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली होती.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here