Skip to content Skip to footer

बर्ड फ्लू संदर्भात अफवा, मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीचे ‘हे’ आदेश

बर्ड फ्लू संदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती पुरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून नमूद केले होते.

बर्ड फ्लू संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात सोमवारी घेतला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेऊन नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरिता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर ३ ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

Leave a comment

0.0/5