Skip to content Skip to footer

एकनाथ खडसे आज ईडी कार्यालयात हजर होणार

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्र्वादी पक्षात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी ‘मला सुद्धा ईडीची नोटीस येऊ शकते’ अशी भविष्य वार्ता केली होती. तसेच सरनाईक यांच्या पाठोपाठ खडसे यांना सुद्धा ईडीने कार्यालयात चौकशीसाठी समन्स बजावला होता.

मात्र गेल्या महिन्यात ३० डिसेंबरला ‘ईडी’कडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र, त्यानंतर एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीची चौकशी लांबणीवर पडली होती. अखेर क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर आज एकनाथ खडसे ‘ईडी’समोर हजर होतील.

सकाळी साधारण ११ च्या सुमारास एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात पोहोचतील असे सांगितले जात आहे. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a comment

0.0/5