Skip to content Skip to footer

“काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत” – संजय राऊत

समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडें यांच्यावर एका महिलेने लावलेल्या बलात्काराच्या आरोपावरून सध्या राजकारण जोरात सुरू आहे. एकीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीकडून मात्र त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षासह विरोधकांना एक सूचक इशारा दिला आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारू नयेत, असा सल्ला वजा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. एखादा दगड तुमच्या काचेच्या घरावर बसला तर तुमचा काच महाल खाली येईल. शीशे के घरमे रहनेवाले दुसरों पर पत्थर फेंका नही करते, हा मंत्र देशातील सर्व राजकारण्यांना लागू होतो, असा सूचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

Leave a comment

0.0/5