Skip to content Skip to footer

मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते संभाजीनगर शहरात विविध कामांचा शुभारंभ

शिवसेना नेते, राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री, संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (दि. १६ जानेवारी) संभाजीनगर महानगरपालिकेतील विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

महानगरपालिका वतीने कांचनवाडी येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प, युएनडिपी ड्राय वेस्ट सेंटर, क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान तयार करण्यात आलेल्या सायकल ट्रॅक तसेच टी. व्हि सेंटर येथील मिनी स्टेडियम व बीओटी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे या कामांचे आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण होणार आहे.

तसेच उद्योग मंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अमरप्रीत चौकातील शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे अनावरण, पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे व चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पाचे लोकार्पण, स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत रेल्वे स्टेशन येथील आऊटडोअर डिस्प्लेचे लोकार्पण, बस वे, आणि शंभर बस थांबा यांचे भुमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Leave a comment

0.0/5