Skip to content Skip to footer

अण्णा हजारेंची समजूत काढण्यात फडणवीसांना अपयश, ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत बसणार उपोषण

केंद्राने पारित केलेल्या कृषी विधेयकावरून मागच्या महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धीत येत्या ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार आहे.

मात्र अण्णा हजारेंची समजूत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बगाडे, खासदार भागवत कराड, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेऊन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.

फडणवीसांनी तब्बल तासभर कृषी कायद्यासंबंधित चर्चा केली होती. मात्र अण्णांनी कृषी कायदे रद्द करा मगच चर्चा करा असे फडणवीसांना ठणकावून सांगितले होते. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र घेऊन माजी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. मात्र पत्रात ठोस काहीही नाही त्यामुळे आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5