Skip to content Skip to footer

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर राहणार उपस्थित

राज्याच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आज एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमालामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जुने मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत चार नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय जुगलबंदी रंगण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.

Leave a comment

0.0/5