केंद्रानं पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात मागच्या एक महिन्यापासून देशभरातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारं आणि शेतकरी संघटना यांच्यात अनेक चर्चा होऊन सुद्धा अदयाप तोडगा निघाला नाही. आत या शेतकरी आंदोलनाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा देण्यात येत आहे.
त्यात या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक शहरातून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो आदिवासी शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी होणार आहेत. तसेच आज आंदोलक राज्यपालांची भेट घेऊन कृषी कायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत.
आझाद मैदानात होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आझाद मैदानात ठिय्या दिला आहे. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकरी ‘चलो राजभवन’ म्हणत राजभवनाकडे कूच करणार आहेत. किसान मोर्चाचे प्रतिनिधी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कृषिकायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत.