Skip to content Skip to footer

मुंबई महानगर पालिकेची मुख्य इमारत पर्यटकांसाठी खुली

ब्रिटिशकालीन बृहमुंबई महानगर पालिकेची मुख्य इमारत पर्यटकांसाठी खुली होणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही इमारत पर्यटकांसाठी खुली होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवार) संध्याकाळी ५ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार हाकणार्‍या महानगरपालिका मुख्यालयाच्या हेरिटेज इमारतीची पर्यटन सफर जानेवारीपासून सर्वसामान्यांना करता येणार आहे. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय’ इमारत दर्शन कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

महानगरपालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करणात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

Leave a comment

0.0/5