Skip to content Skip to footer

दसऱ्याला या राज्यांमध्ये होते रावणाची पूजा

दरवर्षी देशभरात धूमधडाक्यात दसरा साजरा केला जातो. रावणाला जाळून प्रभु रामाची पूजा केली जाते. पण आपल्या देशात अशीही काही राज्यं आहेत जिथे रामाची नाही तर रावणाची पूजा केली जाते. जाणून घेऊ या यामागची कारणं.

मध्य प्रदेश – मध्य प्रदेशात दसऱ्याच्या दिवशी मोठ्या जल्लोषात रावणाची पूजा केली जाते. येथील विदीशा जिल्ह्यात रावणाचे एक मंदिर आहे. मध्य प्रदेशातल रावणाचे ते पहिलचं मंदिर आहे. येथील मंदसौर जिल्ह्यातही रावणाची पूजा केली जाते. येथील खानपुरा क्षेत्रात रावण रुंडी नावाच एक स्थान आहे. येथे रावणाची एक विशाल मूर्ती आहे. या मुर्तीची पूजा केली जाते. रावणाची पत्नी मंदोदरी ही मंदसौरची होती. यामुळेच या ठिकाणी रावणाची पूजा केली जाते.

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमधील प्रसिध्द शहर असलेल्या कानपूरमध्ये प्रसिध्द दशानन मंदिर आहे. येथे शक्तीचे प्रतीक म्हणून रावणाची पूजा केली जाते. रावणापुढे दिवा लावून लोक नवस करतात. १८९० साली या मंदिराची निर्मिती करण्यात आली. वर्षभर हे मंदिर बंदच असते. फक्त दसऱ्याच्याच दिवशी पहाटे हे मंदिर भक्तांसाठी खुले केले जाते. रावणाच्या मूर्तीला सजवले जाते. आरती केली जाते. त्यानंतर संध्याकाळी मंदिर पुन्हा वर्षभरासाठी बंद केले जाते.

https://maharashtrabulletin.com/baapjanma-trailer-released/

कर्नाटक – कर्नाटकातील कोलार जिल्हयात धान्य महोत्सवात रावणाची पूजा केली जाते. यावेळी भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. रावण शंकराचा भक्त असल्याने लंकेश्वर महोत्सवात शंकराच्या मुर्तीबरोबरच रावणाच्याही प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. येथील मंड्या जिल्हयातील मालवल्ली येथे रावणाचे मंदिर आहे. तेथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

राजस्थान – जोधपूर जिल्हयातील मंदोदरी क्षेत्रात रावण आणि मंदोदरी यांचा विवाह संपन्न झाला होता असे मानले जाते. यामुळे रावणाची पूजा केली जाते. रावणाची चवरी नावाने एक छत्रीही येथे आहे. येथील चांदपोल क्षेत्रात रावणाचे मंदिरही आहे.

हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेश मधील कांगडा जिल्हयात शिवनगरी नावाने प्रसिध्द बैजनाथ ठिकाण आहे. येथे रावणाचा पुतळा जाळणं हे पापकृत्य असल्याचं मानल जातं. येथील रावणाच्या मुर्तीची भक्तीभावाने पूजा केली जाते. रावणाने मोक्ष मिळवण्यासाठी येथेच शिवाची तपस्या करुन वर मिळवला होता असं बोललं जात.

अधिक माहिती

Leave a comment

0.0/5